शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

Kerala Assembly Election: विराेधी पक्षनेते भाजप सरकारचे समर्थक; मुख्यमंत्री विजयन यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 05:57 IST

विजयन यांनी संघ परिवारावर ‘केआयआयएफबी’सारख्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप केला.

काेची : केरळमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा विध्वंसक हालचाली करत असून विराेधात असलेली काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी त्यांच्याच सुरात सूर मिळवीत असल्याचा आराेप मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केला. काेचीमध्ये ते प्रचारसभेत बाेलत हाेते. 

विजयन यांनी संघ परिवारावर ‘केआयआयएफबी’सारख्या संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप केला.  केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्याचे नुकसान हाेत असून यूडीएफ या संस्थांच्या कारवायांना समर्थन देत असल्याचा आराेप केला. राज्यातील विराेधी पक्षनेते आणि यूडीएफचे नेते रमेश चेन्नीतला हे भाजप सरकारचे मजबूत समर्थक बनल्याची टीकाही विजयन यांनी केली. तसेच काँग्रेसकडून राज्य सरकारच्या ‘लाइफ मिशन’सारख्या याेजनांचे नुकसान हाेत असल्याचेही विजयन म्हणाले.

नड्डांचे सत्ताधाऱ्यांवर शरसंधानकाँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विचारधारेवर जाेरदार हल्ला चढविताना शबरीमाला मंदिराच्या मुद्द्यावरून  भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले. केरळच्या चकरक्कल येथे नड्डा यांचा राेड शाे आयाेजित करण्यात आला हाेता. त्यानंतर आयाेजित सभेत नड्डा यांनी शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सरकारवर महिलांचे आंदाेलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप केला. माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्यावर टीका करताना नड्डा म्हणाले, शबरीमालाबाबत केवळ भाजपने सातत्य दाखविले आहे. २०११ मध्ये शबरीमाला येथे चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला हाेता. त्यावेळी सिंग यांनी भेटही दिली नव्हती. याउलट २०१६ मध्ये फटाक्यांच्या साठ्याचा स्फाेट झाल्यामुळे ११४ जणांचा मृत्यू झाला हाेता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घटनास्थळी भेट दिली हाेती, असे नड्डा म्हणाले. 

सोनेतस्करीचा मुद्दासाेन्याच्या तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री कार्यालय गुंतल्याचाही आराेप नड्डा यांनी केला. नड्डा म्हणाले, केंद्रीय यंत्रणेद्वारे तपास करण्याची मागणी त्यांनीच केली हाेती. मात्र, तपास यंत्रणांचे हात मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पाेहाेचल्यानंतर केंद्र सरकारवर आराेप केले. सत्ताधारी पक्ष विचारधारेच्या बाबतीत संभ्रमित आहेत. केरळमध्ये ते एकमेकांच्या विराेधात लढतात, मात्र, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी हातमिळवणी केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा