शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Kerala Floods : मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा', पाठीवरती...

By महेश गलांडे | Updated: August 25, 2018 12:15 IST

Keral floods: केरळवासीय आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करत आहेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होत आहेत. मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढत आहेत अन् ओनमच्या स्वागताला पायघड्या घालत आहेत.

मुंबई : इयत्ता दहावीला असताना मराठीच्या मॅडमने तोंडी परीक्षेसाठी समोर बोलावलं की आम्ही फुल्ल कॉन्फीडन्समध्ये निघायचो. कविता म्हणा असं मॅडमने म्हणताच आम्ही सुरू करायचो, 'ओळखलतं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरतील पाणी....' कवी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता आमच्यासारख्या अभ्यासात मध्यमवर्गीय असलेल्यांनाही तोंडपाठ होती. तर, वर्गातील हुश्शार पोरंही हीच कविता म्हणायचे. अर्थात, कविता सहज सोपी आणि सुंदर शब्दात गुंफलेली होती. मात्र, मॅडमने त्या कवितेतील ओळीचा अर्थ विचारला की, मग बोबडी वळायची. कारण, कवितेचा अर्थ कळेल एवढी प्रगल्भता त्यावेळी नव्हती. आज त्या कवितेचा अर्थ कळतोय, सोबतच त्यातील दु:ख अन् जबर आत्मविश्वासही समजतोय. 

केरळमध्ये आलेला महाप्रलय कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींची आठवण करुन देतोय. सोबतच त्याचा अर्थही समजावून सांगतोय. कारण, कवितेतील पीडिताच्या घरी गंगामाई पाहुणी बनून आली अन सर्वकाही घेऊन गेलीय. तसचं, आज केरळमध्येही पीडितांच्या घरात कित्येक दिवसांपासून चुर्णी, नेत्रावती, पेरियार, प्रतीची अशा तब्बल 44 नद्यांनी मुक्काम ठोकलाय. या नद्यांनी केरळवासीयांच होत नव्हतं सगळं नेलंय, तर प्रसाद म्हणून डोळ्यांमध्ये पाणी तेवढं ठेवलंय. केरळवासीयांच्या डोळ्यात साचलेल पाणी आज अरबी समुद्रापेक्षाही मोठ्ठ वाटू लागलयं. भरल्या डोळ्यातील या पाण्यात उसळणाऱ्या लाटाही अनेकांच्या काळजाच पाणी-पाणी करतायेत. तरीही या सागराएवढ्या दु:खातून पुन्हा सावरायचंय, उभ राहायचयं, नव्याने संसार थाटायचाय अन् शून्यातून पुन्हा विश्व उभा करायचयं. तर अंगणात येऊन ठेपलेल्या ओनम सणाचही सेलिब्रेशन केरळवासीयाना करायचयं. पण...

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या दु:खातून सावरतो न सावरतो, तोच केरळमधील महाप्रलयामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात न घडलेल्या नसैर्गिक आपत्तीने आज केरळचं सौंदर्य नष्ट केलयं. जनजीवन विस्कळीत करून टाकलयं. येथील महापुरात आत्तापर्यंत 370 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर जवळपास 50 हजार लोक बेघर झाले आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त लोक रिलीफ कॅम्पात स्थलांतरीत आहेत. पण, या आपत्तीतही वर्षाचा सण दारात येऊन ठेपलाय, अन् तो मल्याळम लोकांना साजरा करायचायं.

केरळमधील मोठा उत्सव मानला जाणारा 'ओनम' सण तोंडावर आला आहे. तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवावर यंदा दु:खाचे पाणी फेरले आहे. मात्र, आलेल्या परिस्थितीला तोंड देत जगणं हेच खरं जगण आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरही आपण पिटलं-भाकरी का होईना खातोच की. अगदी तसचं काळजावर दगड ठेवून केरळवासीय आपलं घरटं पुन्हा बांधण्याची तयारी करत आहेत. आपलं दु:ख विसरून पुन्हा जगायला तयार होत आहेत. मोडलेला संसार पुन्हा उभारायला परिस्थितीशी लढत आहेत अन् ओनमच्या स्वागताला पायघड्या घालत आहेत.

केरळच्या प्रकोपात कुणी आपली आई गमावलीय, कुणी भाऊ, कुणी चिमुकला तर कुणी बायको. कुणी घर, शेत गमावलयं, कुणी सर्वस्व गमावलयं तर कुणी केरळलाच गमावलयं. केरळचं दु:ख अंगावर झेलत प्रत्येक केरळवासी आज केरळसाठी उभारतोय. म्हणूनच तेथील एका वडिलांनी त्यांच्या पत्रकार मुलाला, एवढ्या संकटाकाळातही तू तूझं काम करं असं बजावलयं. केरळचं दु:ख, केरळचं संकट तू जगाला दाखव, त्यासाठी देवानच तुझी निवड केलीय, असं या धाडसी बापानं आपल्या पत्रकार पोराला म्हटलयं. एवढ्या दु:खातही कुठून येते ही ताकद. कुठून येते ही हिंमत, जी कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा बनते. तर, आपल्या घरात घुसकोरी केलेल्या नदीच्या पाण्यातून कसाबसा जीव वाचवून रिलीफ कॅम्पात पोहोचलेल्या आजीबाईच्या हाती, चहाचा एक कप लागला, तेव्हा तो कपही तिला अमृतासमान वाटतोय. भरल्या डोळ्यांनी लाखो-लाखो आशिर्वाद तिने एका चहाच्या बदल्यात रिलीफ कॅम्पमधील लोकांना दिलेत. 

केरळच्या प्रलयाने गर्व, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्वकाही जमिनीवर आणलयं. म्हणूनच, केरळमध्ये जिल्हाधिकारी हमाल बनलेत, मंत्रिमहोदय मालवाहू बनलेत, सैन्याचे जवान पाठीचा पूल करतायेत, तर बचाव पथकातील स्वयंसेवक स्वत: उपाशी राहून तेथील लोकांची भूक भागविण्याचा प्रयत्नतायत. दिवसरात्र एक करुन प्रत्येकजण आपलं कर्तव्य बजावत आहे. 

भारत देशाला नैसर्गिक संकटं नवी नाहीत, पण प्रत्येक संकटातून आपण उभारतोय. स्वत:ला सावरतोय. उत्तराखंडचा महाप्रलय असेल, गुजरातचा महापूर असेल, मुंबईचा विनाशकारी पाऊस असेल, लातूरचा भूकंप असेल किंवा माळीणचा कोसळलेला डोंगर असेल. आम्ही रडलोय, पण तेवढ्याच ताकदीने परिस्थितीशी लढलोय. त्याच दमाने, त्याच आत्मविश्वाने आणि त्याच जबाबदारीने आम्ही उभारलोय. यावेळी आम्ही हिंदू नसतो, मुस्लीम नसतो, कुठल्याही जातीचे नसतो, राजकीय पक्षाचे नसतो, तर केवळ भारतीय असतो, केवळ एक माणूस असतो. म्हणूनच एक भारतीय बनून आज प्रत्येक भारतवासी केरळच्या मदतीसाठी उभा आहे. प्रत्येकजण माणूस म्हणून केरळच्या मदतीला धावतोय.

केरळच्या पुनर्वसनासाठी 2600 कोटी रुपयांची गरज असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलयं. या 2600 कोटी रुपयांतून निसर्गसृष्टीनं नटेलेल्या केरळचं पुनर्वसन करायचयं. त्यासाठी, केरळला देशभरातून आर्थिक मदत केली जातेय. केंद्र सरकारकडूनही 500 कोटींची मदत जाहीर झाली आहे. तर बहुतांश राज्य सरकारनेही निधी देऊ केला आहे. खेळाडूंपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत, कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते इस्रोपर्यंत सर्वचजण केरळसाठी मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. मात्र, मदतीसोबतच केरळवासीयांना गरज आहे ती मानसिक धीर देण्याची, त्यांना गरज आहे  ती सहानुभूतीची अन् आपल्या आधाराची. म्हणूनच कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा' कवितेच्या शेवटच्या चार ओळी येथे आवर्जून आठवतात. 

खिशाकडे हात जाता, हसत हसत उठलापैसै नको सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही 'कणा'पाठीवरती हात ठेऊनी, फक्त लढ म्हणा....

#We_are_with_kerala

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर