टॅक्सीतून खेचून केनियन महिलेला जबर मारहाण

By Admin | Updated: March 30, 2017 01:55 IST2017-03-30T01:55:15+5:302017-03-30T01:55:15+5:30

आफ्रिकन विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सत्र अजूनही चालूच असून, मंगळवारी रात्री एका केनियन महिलेला टॅक्सीतून

Kenyan woman raped by taxi | टॅक्सीतून खेचून केनियन महिलेला जबर मारहाण

टॅक्सीतून खेचून केनियन महिलेला जबर मारहाण

ग्रेटर नोएडा : आफ्रिकन विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सत्र अजूनही चालूच असून, मंगळवारी रात्री एका केनियन महिलेला टॅक्सीतून बाहेर खेचून काही लोकांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नायजेरियन विद्यार्थ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यांना सुरक्षा देण्याची खात्री देऊनही मंगळवारी रात्री केनियन महिलेच्या बाबतीत हा भयंकर प्रकार घडला.
स्वत:वर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगाची तिने तक्रार देत ‘आपबीती’ कथन केली. मंगळवारी रात्री ओला टॅक्सीतून जात असताना काही अज्ञात लोकांनी बळजोरी करीत टॅक्सी थांबविली. नंतर टॅक्सीतून बाहेर खेचून बेदम मारहाण केली, असे तिने तक्रारीत म्हटल्याचे पोलीस उपअधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. सेक्टर ओमीक्रॉन येथे हा थरारक प्रकार घडला.
पीडिता केनियन महिलेल्या कैलाश इस्पितळात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिला इस्पितळातून सुटी देण्यात आली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, गुन्हेगारांचा कसून शोध घेतला जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Kenyan woman raped by taxi