केळवद... रक्तदान
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30
रक्तदानामुळे जीवन सार्थक

केळवद... रक्तदान
र ्तदानामुळे जीवन सार्थकनिशा पांडे : केळवद आरोग्य केंद्रात ७२ जणांनी केले रक्तदान केळवद : रक्तदानामुळे दुसऱ्याचे प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म आपल्या पदरात पडते. त्यामुळे जीवनाचे सार्थक होते, असे विचार स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे यांनी व्यक्त केले. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा पांडे, जिल्हा परिषद सदस्य अंजिरा उईके, मोहन वानखेडे, चैतराम कामडी, मंगेश उराडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या शिबिरात मेयो रुग्णालयातील रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलन केले. यावेळी डॉ. गौरव कंच, परिचर भगत यांची उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराज हाडके यांनी आभार मानले. शिबिरात महिला आरोग्य अभियानांतर्गत गरोदर मातांची तपासणी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)