केजरी लागले कामाला

By Admin | Updated: February 17, 2015 02:28 IST2015-02-17T02:28:54+5:302015-02-17T02:28:54+5:30

गेल्या पाच दिवसांपासून असलेला ताप पळून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालविला.

Kejriya started working | केजरी लागले कामाला

केजरी लागले कामाला

नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून असलेला ताप पळून गेला असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कार्यालयाचा पहिला दिवस कामात घालविला.
माझा ताप गेला आहे. आता खूप चांगले वाटत आहे. मी दैनंदिन योगा करीत माझ्या सकाळच्या कामांना प्रारंभ केला. निवडणुकीमुळे ते शक्य नव्हते, असे केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. पाच दिवस तापाने फणफणत असतानाही केजरीवाल यांनी भेटीगाठी आणि आपले कार्यक्रम सुरूच ठेवले होते.
पहिल्याच दिवशी पत्रकारांना सचिवालयात प्रवेशाला मज्जाव केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देत मनाई केल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितले. दरम्यान, जनतेशी संवादात अडचणी निर्माण होत असल्याने केजरीवाल सुरक्षा स्वीकारण्याबाबत अनिच्छुक असले तरी त्यांच्या गरजेनुसार ती पुरविण्याची तयारी असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

च्केजरीवालांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण सहकार्य द्या, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. सांघिक सहकार्याचे वातावरण जपण्यासाठी पक्षभेद बाजूला सारत प्रत्येक राज्याला मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. दिल्ली पोलिसांच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Web Title: Kejriya started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.