केजरीवाल यांची जीभ घसरली, पक्षांतर्गत विरोधकांना कमीने म्हटले
By Admin | Updated: March 27, 2015 20:17 IST2015-03-27T19:45:49+5:302015-03-27T20:17:42+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नवे स्टिंग ऑपरेशन उघड झाल्याने आपची नाचक्की झाली आहे. नवीन स्टिंगमध्ये केजरीवाल योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यावर अत्यंत असभ्य भाषेत टीका करत आहेत.

केजरीवाल यांची जीभ घसरली, पक्षांतर्गत विरोधकांना कमीने म्हटले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नवे स्टिंग ऑपरेशन उघड झाल्याने आपची नाचक्की झाली आहे. नवीन स्टिंगमध्ये केजरीवाल योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यावर अत्यंत असभ्य भाषेत टीका करत असून या स्टिंगमुळे केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
वाराणसीतील आपचे नेते उमेश सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत फोनवर झालेले संभाषण शुक्रवारी उघड केले. यामध्ये केजरीवाल हे योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांचा उल्लेख 'कमीने' म्हणून करत होते. या दोघांनाही पक्षातून लाथा मारुन बाहेर काढायला हवे होते असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्या असभ्य भाषेवर सोशल मिडीयावर चांगलीच टीका होत आहे. आपमधील नेत्यांचे खरे चेहरे आता बाहेर आले आहेत असा टोला काँग्रेस नेते पीसी चाको यांनी लगावला आहे.