केजरीवालांची पुन्हा राजकीय स्टंटबाजी
By Admin | Updated: May 22, 2014 04:50 IST2014-05-22T04:50:15+5:302014-05-22T04:50:15+5:30
पराभव पत्कराव्या लागलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एका न्यायालयीन प्रकरणात घेतलेल्या पवित्र्याकडे राजकीय स्टंट म्हणून पाहिले जात आहे.

केजरीवालांची पुन्हा राजकीय स्टंटबाजी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एका न्यायालयीन प्रकरणात घेतलेल्या पवित्र्याकडे राजकीय स्टंट म्हणून पाहिले जात आहे. भाजपा नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने आज बुधवारी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़ यानंतर तिहार तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली़ गडकरींनी केजरीवालांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. बुधवारी सुनावणीदरम्यान महा न्यायदंडाधिकारी गोमती मनोचा यांनी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर केला़ तथापि, केजरीवाल यांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला़ मी जातमुचलक्याची रक्कम भरणार नाही़ मी तुरुंगात जायला तयार आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले़ जेव्हा एखादा आरोपी जामिनासाठीची जातमुचलक्याची रक्कम भरण्यास नकार देते तेव्हा त्यास कोठडीत पाठविण्याशिवाय पर्याय नसतो, असे न्यायालयाने (पान १० वर)