केजरीवाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:19+5:302015-02-11T00:33:19+5:30

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांची मंगळवारी आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.

Kejriwal's election as the Leader of the Constituent Assembly | केजरीवाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

केजरीवाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

ी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांची मंगळवारी आप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला.
कन्स्टट्यिूशन क्लब येथे बैठकीला संबोधित करताना केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपचा पराभव केल्याबद्दल सर्व पक्ष आमदारांचे अभिनंदन करतानाच त्यांना सभ्यपणा बाळगण्याचा सल्ला दिला. अरेरावीमुळेच काँग्रेस पक्ष आज शून्यात जमा झाला आहे. केंद्रातील भाजपलाही अरेरावी नडली आहे. त्यामुळे आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारे उद्धटपणा दिसू देऊ नका. तुम्हाला मिळालेल्या जनादेशाचा आदर करा, असेे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Kejriwal's election as the Leader of the Constituent Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.