अण्णांच्या मंचावर केजरीवालांची हजेरी!

By Admin | Updated: February 25, 2015 01:58 IST2015-02-25T01:58:35+5:302015-02-25T01:58:35+5:30

वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आरंभलेल्या लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री

Kejriwal's attendance on Anna's stage! | अण्णांच्या मंचावर केजरीवालांची हजेरी!

अण्णांच्या मंचावर केजरीवालांची हजेरी!

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आरंभलेल्या लाक्षणिक धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली़ भाकपाचे अतुल अंजान आणि एमडीएमकेचे वायको हेही अण्णांच्या व्यासपीठावर दिसले़
कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला व्यासपीठावर सोबत घेण्यास आधी नकार देणारे अण्णा आज आपल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी काहीसे मवाळ झालेले दिसले़ अण्णांनी केजरीवालांसह या सर्व नेत्यांचे स्वागत केले़आंदोलनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षांच्या लोकांचे मी स्वागत करतो़ मात्र आंदोलनास कुठलाही राजकीय रंग देण्याची परवानगी मी देणार नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले़ राजकीय पक्ष याच देशातील आहेत, सरकारमधील लोकही या देशाचेच आहेत आणि अन्याय झेलणारेही याच मातीतील आहेत़ शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आणि या अन्यायाविरुद्ध सर्वजण एकत्र येत असतील तर काहीही हरकत नसावी, असेही अण्णानी स्पष्ट केले.

Web Title: Kejriwal's attendance on Anna's stage!