‘केजरीवाल मोदींशीही मैत्री करतील’

By Admin | Updated: May 25, 2016 03:46 IST2016-05-25T03:46:42+5:302016-05-25T03:46:42+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे खऱ्याखोट्याची चाड नसलेले गृहस्थ आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीसुद्धा हातमिळवणी करतील

Kejriwal will make friends with Modi | ‘केजरीवाल मोदींशीही मैत्री करतील’

‘केजरीवाल मोदींशीही मैत्री करतील’

वॉशिंग्टन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे खऱ्याखोट्याची चाड नसलेले गृहस्थ आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीसुद्धा हातमिळवणी करतील, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली.
केजरीवाल हे पूर्णपणे तत्त्वहीन असून, ज्या दिवशी त्यांना फायदा होणार आहे त्या दिवशी ते मोदींशी मैत्री करतील याबद्दल मला शंका नाही, असे भूषण म्हणाले. भूषण सध्या येथे खासगी दौऱ्यावर आले असून, ते सोमवारी रात्री भारतीय अमेरिकनांच्या छोट्याशा गटाशी बोलत होते. दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भूषण यांनी हे विधान केले. केजरीवाल यांचे हे ‘वैशिष्ट्य’ याआधी ओळखता न आल्याबद्दल खेद होतो. विश्वासार्हता मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी माझा आणि योगेंद्र यादव यांचा वापर करून घेतला, असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यात केजरीवाल यांना गोडी नाही. केजरीवाल यांच्यात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची लक्षणे आहेत. ती म्हणजे त्यांनी स्वत: कधी पैसे घेतले नाहीत; परंतु त्यांच्या भोवती असणाऱ्यांना भ्रष्टाचार करू दिला.
-प्रशांत भूषण

Web Title: Kejriwal will make friends with Modi