EVM मधून आमची मतं चोरली, पंजाबमधील पराभवामुळे केजरीवाल संतापले
By Admin | Updated: March 15, 2017 12:19 IST2017-03-15T12:17:25+5:302017-03-15T12:19:47+5:30
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतं अकाली दल युती आणि काँग्रेसला ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे

EVM मधून आमची मतं चोरली, पंजाबमधील पराभवामुळे केजरीवाल संतापले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्चचिन्ह उपस्थित करत पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतं अकाली दल युती आणि काँग्रेसला ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना आम आदमी पक्षाला पंजाबमधून बाहेर ठेवण्यासाठी ईव्हीएमसोबत फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर बोलताना अरविंद केजरीवाल बोलले आहेत की, 'प्रत्येक सर्व्हेमध्ये आपच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. पण आम्ही दुस-या नंबरवर गेलो. पंजाबमध्ये अकाली युतीचा पराभव करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरोधात मतदान केल्याचं बोललं जात असतानाही त्यांना 30 टक्के मतं कशी काय मिळाली. सामान्य लोकांनाही आपचा विजय होईल असा विश्वास होता. अकाली युतीपेक्षा सहा टक्के कमी मतं आम्हाला कशी काय मिळाली ?. ईव्हीएमसोबत फेरफार करत आपची मतं अकाली युतीला ट्रान्सफर करण्यात आल्याची शंका अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. 'आमची 20 ते 25 टक्के मतं अकाली युती आणि काँग्रेसला ट्रान्सफर करण्यात आल्याचा', आरोप केजरीवालांनी केला आहे.
Our vote share went to Akalis & Cong won in Punjab.Akali's victory would've made it too obvious.They only wanted to keep AAP out: Kejriwal pic.twitter.com/nW5YOLD8UC
— ANI (@ANI_news) March 15, 2017
'कोणत्याही सर्व्हेत काँग्रेसच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली नव्हती, तरीही काँग्रेसला इतकी मतं कशी काय मिळाली. सर्व निकाल उलट कसे काय लागले', असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे.
25-30%of AAP's vote was transferred to SAD so Congress won election. They wanted AAP to lose any which way: Arvind Kejriwal on EVM tamper pic.twitter.com/ZoU4E6x2rs
— ANI (@ANI_news) March 15, 2017
दिल्लीत आपचा दणदणीत विजय झाला तेव्हा तुम्ही हा मुद्दा का उपस्थित केला नाही असं विचारला असता, 'त्यावेळी भाजपाने किरण बेदींना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं होतं. त्यामुळे त्यांना आपल्या विजयाची खात्री झाल्याने बेफिकीर होते. त्यामुळे असं काही झालं नाही', असं केजरीवाल बोलले आहेत.