केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:37 AM2023-11-02T10:37:32+5:302023-11-02T10:37:55+5:30

केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत.

Kejriwal to campaign in Madhya Pradesh instead of ED inquiry; AAP fear of arrest, Delhi politics | केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीने समन्स पाठवून आज चौकशीसाठी बोलविले होते. केजरीवाल काल रात्रीपर्यंत चौकशीला जाणार असे पक्के होते. परंतू, आज सकाळीच ईडीने दिल्लीचे आणखी एक मंत्री राज कुमार आनंद यांच्या घरावर छापेमारी केली आहे. जवळपास ९ ठिकाणी हा छापा सुरु असून केजरीवालांनी आजच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच ईडीची नोटीस बेकायदेशीर आहे. भाजपाच्या सांगण्यावरून ईडीने ही नोटीस पाठविली आहे. जेणेकरून मी चार राज्यांच्या प्रचाराला जाऊ नये, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. 

केजरीवाल यांनी ईडीच्या नोटीसीवर उत्तर दिले आहे. यामध्ये ईडीने ही नोटीस त्वरीत मागे घ्यावी, असे म्हटले आहे. तसेच केजरीवाल ईडीच्या चौकशीला जाणार नसून ते मध्य प्रदेशच्या सिंगरौलीमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहेत. 

कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने एप्रिलमध्ये केजरीवाल यांची चौकशी केली होती, त्यादरम्यान त्यांना सुमारे 56 प्रश्न विचारण्यात आले होते. चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांनी हे संपूर्ण प्रकरण ‘बनावट’ आणि ‘आप’ला नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.

Web Title: Kejriwal to campaign in Madhya Pradesh instead of ED inquiry; AAP fear of arrest, Delhi politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.