केजरीवाल संघातलेच - दिग्विजय सिंह
By Admin | Updated: February 15, 2015 16:51 IST2015-02-15T16:51:45+5:302015-02-15T16:51:52+5:30
अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काँग्रेसमुक्त भारत या अभियानात सहभागी आहेत असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

केजरीवाल संघातलेच - दिग्विजय सिंह
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काँग्रेसमुक्त भारत या अभियानात सहभागी आहेत असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानामुळे आप काय प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन २४ तासांचा कालावधीही लोटला नसतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरुन तिखट शब्दात केजरीवालांवर प्रहार केला. 'अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामागे संघाचा हात असल्याचा आरोप मी यापूर्वी केला होता. त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण कालांतराने मी केलेला आरोप खरा असल्याचे उघड झाले होते' असे त्यांनी नमूद केले. अरविंद केजरीवालही संघाच्या गोटातले आहेत असे त्यांनी सांगितले.