मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी केजरीवालांनी गायलं गाणं...
By Admin | Updated: May 16, 2016 17:05 IST2016-05-16T16:46:30+5:302016-05-16T17:05:19+5:30
पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवील यांनी ३० सेंकदाचे एक गाणे गायले आहे.

मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी केजरीवालांनी गायलं गाणं...
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ३० सेकंदांचे एक गाणे गायले असून ते सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. ' ऐसे गगन के तले' असे शब्द असलेले गाणे केजरीवाल यांनी गायले असून त्याचा ३० सेकंदांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने त्यांचे फेसबूक पेज, ट्विटर अकाऊंटसह यूट्यूबवरही हा व्हिडीओ टाकला असून नेटिझन्सनी तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. ‘ आ चलके तुझे मैं लेके चलूँ इक ऐसे गगन के तले, जहाँ चोर भी ना हो, जहाँ भ्रष्ट भी ना हों, बस आप का राज चले,‘ असे गाण्याचे बोल आहेत.
यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना केजरीवाल यांनी ' इन्सान का इन्सान से हो भाईचारा...‘ हे गाणे गायले होते.