हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:22 AM2020-03-04T04:22:27+5:302020-03-04T04:22:39+5:30

दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली.

Kejriwal-Modi talks on violence, consultation on helpline | हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

हिंसाचाराबाबत केजरीवाल-मोदी यांच्यात चर्चा, मदतकार्याविषयी केली सल्लामसलत

Next

नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करणाऱ्या आणि त्याला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मंगळवारी केली. केजरीवाल यांनी संसद भवनात पंतप्रधानांची भेट घेतली आणि हिंसाचारग्रस्तांना मदत करण्याबाबतही सल्लामसलत केली.
मात्र हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर कारवाईबद्दल मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्रीपदी तिसºयांदा निवडून आल्यानंतर केजरीवाल यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्या दोघांनी दिल्लीतील सध्याची परिस्थिती आणि घ्यावयाची काळजी यावर चर्चा केली.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्ली पोलीस सध्या अधिक सक्रिय आहेत. यापूर्वी दिल्ली पोलीस सतर्क राहिले असते तरी दिल्लीत ही स्थिती उद्भवली नसती आणि झालेले नुकसान टाळता आले असते.
दंगलीनंतर दिल्लीत अनेक अफवा पसरविल्या जात असून, यामुळे घाबरून अनेक लोक घरे सोडून जात आहेत. या अफवांवर कसे नियंत्रण आणता येईल, यावरही आमच्यात चर्चा झाली. हिंसाचारामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी आणि दिल्लीत यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
>भाजप नेत्यांची विधाने
भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याने दिल्लीतील दंगल होण्यास कारणीभूत ठरली. यावर पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

Web Title: Kejriwal-Modi talks on violence, consultation on helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.