केजरीवाल राजनाथसिंहांना भेटले

By Admin | Updated: June 16, 2015 02:39 IST2015-06-16T02:39:14+5:302015-06-16T02:39:14+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली.

Kejriwal met Rajnath Singh | केजरीवाल राजनाथसिंहांना भेटले

केजरीवाल राजनाथसिंहांना भेटले

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली.
राज्याचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबतचा संघर्ष आणि दिल्ली सरकारशी अनेक मुद्यांवर यादरम्यान चर्चा झाल्याचे कळते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तासभर चाललेल्या या भेटीत केजरीवाल यांनी आपल्या सरकारच्या अनेक समस्यांचा पाढा वाचला.
नोकरशहांच्या नियुक्त्या आणि बदल्याच्या मुद्यावर जंग यांच्यासोबतच्या संघर्षामुळे उद्भवणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी राजनाथसिंह यांना दिली. केजरीवाल आणि सिसोदिया उभयंतांनी सरकार चालविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले.
अन्य एका सूत्राने सांगितले की, राजनाथसिंह यांनी केजरीवाल व सिसोदियांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आणि कें द्र सरकारकडून संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Kejriwal met Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.