केजरीवाल भेटीगाठी/ जोड राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींना भेटले

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:53+5:302015-02-11T23:19:53+5:30

नवी दिल्ली : केजरीवाल यांनी बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ सहकारी मनीष सिसोदिया हे होते. ही शिष्टाचार भेट होती. आपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दोन पुस्तके भेट दिली. त्यातील एक पुस्तक भारतीय राज्यघटनेसंबंधी तर दुसरे पुस्तक एका माजी राष्ट्रपतींनी लिहिलेले असल्याचे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्य सचिव डी.एम. सपौलिया यांना पाचारण करीत आपचा ७० कलमी जाहीरनामा सादर केला. सर्व विभागांशी संबंधित मुद्यांवर अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिल्याचे समजते. १९ फेब्रुवारी रोजी दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारी विविध मुद्यांवर सादरीकरण करतील.

Kejriwal met the President / Vice President / President | केजरीवाल भेटीगाठी/ जोड राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींना भेटले

केजरीवाल भेटीगाठी/ जोड राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींना भेटले

ी दिल्ली : केजरीवाल यांनी बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ सहकारी मनीष सिसोदिया हे होते. ही शिष्टाचार भेट होती. आपच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दोन पुस्तके भेट दिली. त्यातील एक पुस्तक भारतीय राज्यघटनेसंबंधी तर दुसरे पुस्तक एका माजी राष्ट्रपतींनी लिहिलेले असल्याचे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्य सचिव डी.एम. सपौलिया यांना पाचारण करीत आपचा ७० कलमी जाहीरनामा सादर केला. सर्व विभागांशी संबंधित मुद्यांवर अंमलबजावणी करण्याचा आदेशही दिल्याचे समजते. १९ फेब्रुवारी रोजी दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिकारी विविध मुद्यांवर सादरीकरण करतील.

Web Title: Kejriwal met the President / Vice President / President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.