मोदींच्या मातृभेटीवरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

By Admin | Updated: January 10, 2017 13:31 IST2017-01-10T13:31:44+5:302017-01-10T13:31:44+5:30

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी योगासनाला दांडी मारत आईची भेट घेतली, यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खिल्ली उडवली आहे

Kejriwal kicked the Modi's mother-in-law | मोदींच्या मातृभेटीवरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

मोदींच्या मातृभेटीवरुन केजरीवालांनी उडवली खिल्ली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी योगासनाला दांडी मारत आईची भेट घेतली, यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खिल्ली उडवली आहे. घर मोठे आहे, आई आणि पत्नीलाही सोबत धेवा असा सल्ला देखिल दिला. 
 
'मी आपल्या आईसोबत राहतो. तिचा दररोज आशीर्वाद घेतो, मात्र याचा गाजावाजा करत नाही. राजकारणासाठी मी माझ्या आईला बँकेच्या रांगेतही उभे करत नाही. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सांगते की आपली वयोवृद्ध आई आणि धर्मपत्नीला स्वतःसोबत ठेवले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे, थोडे हृदय देखील मोठे करा.', असे ट्विट करत केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या मातृभेटीवर टीका केली आहे. 
 

Web Title: Kejriwal kicked the Modi's mother-in-law