केजरीवाल/ जोड झोपड्या पाडण्याची मोहीम रोखली

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:40+5:302015-02-16T21:12:40+5:30

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत सध्या सुरू असलेली अनधिकृत झोपड्या हटविण्याची मोहीम तडकाफडकी रोखली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रपरिषद बोलावली होती; मात्र काही पत्रकारांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी ती रद्द केली. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती सरकारच्या वेबसाईटवर न देता आम आदमी पार्टीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडले जाणार नाही. योग्य व्यवस्था होईपर्यंत कुणालाही निवाऱ्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आपने टिष्ट्वटर संदेशात म्हटले. शनिवारी शाहदरा भागात आठ झोपड्या हटविण्यात आल्यानंतर लोकांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली होती.

Kejriwal / Junk hut campaign has been stopped | केजरीवाल/ जोड झोपड्या पाडण्याची मोहीम रोखली

केजरीवाल/ जोड झोपड्या पाडण्याची मोहीम रोखली

ख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत सध्या सुरू असलेली अनधिकृत झोपड्या हटविण्याची मोहीम तडकाफडकी रोखली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रपरिषद बोलावली होती; मात्र काही पत्रकारांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी ती रद्द केली. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती सरकारच्या वेबसाईटवर न देता आम आदमी पार्टीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडले जाणार नाही. योग्य व्यवस्था होईपर्यंत कुणालाही निवाऱ्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आपने टिष्ट्वटर संदेशात म्हटले. शनिवारी शाहदरा भागात आठ झोपड्या हटविण्यात आल्यानंतर लोकांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली होती.

Web Title: Kejriwal / Junk hut campaign has been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.