केजरीवालांकडे पैशापेक्षा खटले अधिक
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:30+5:302015-01-22T00:07:30+5:30
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.९ कोटींची मालमत्ता असून ती मागील लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेहून पाच लाखांनी कमी आहे. मात्र त्यांच्यावरील खटल्यांची संख्या ही मागील वर्षापेक्षा अधिक झाली आहे.

केजरीवालांकडे पैशापेक्षा खटले अधिक
न ी दिल्ली- आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे व त्यांच्या पत्नीकडे एकूण २.९ कोटींची मालमत्ता असून ती मागील लोकसभा निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेहून पाच लाखांनी कमी आहे. मात्र त्यांच्यावरील खटल्यांची संख्या ही मागील वर्षापेक्षा अधिक झाली आहे.निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केजरीवाल यांनी, त्यांच्याजवळ २.२६ लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे १५.२८ लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात नऊ लाखांचे सोने व २४ हजारांची चांदी समाविष्ट आहे. केजरीवालांकडे तीन सदनिकाही आहेत. विविध न्यायालयांमध्ये त्यांच्याविरुद्ध १० प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील प्रतिज्ञापत्रात त्यांनी सात खटल्यांची नोंद केली होती.