शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:40 IST

केजरीवाल म्हणाले, आज या दोन्ही जागांवर आम्ही २०२२ च्या निवडणुकीत जेवढ्या फरकाने जिंकलो होतो, जवळपास त्याहून दुप्पट फरकाने आता विजयी झालो आहेत.

गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खूश आहेत. या विजयानंतर, पत्रकारांसोबत बोलताना केजरीवाल म्हणाले, मी गोपाल इटालिया आणि संजीव अरोरा आणि तेथील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो.

केजरीवाल म्हणाले, आज या दोन्ही जागांवर आम्ही २०२२ च्या निवडणुकीत जेवढ्या फरकाने जिंकलो होतो, जवळपास त्याहून दुप्पट फरकाने आता विजयी झालो आहेत. हा विजय 'आप'च्या धोरणांवर आणि कामांवर शिक्कामोर्तब करणार आहे. जर पंजाबमध्ये २०२२ चा विजय वादळ होता, तर २०२७ मध्ये तुफान येईल."केजरीवाल पुढे म्हणाले, "विसावदर विधानसभेच्या जागेच्या निकालावरून, दिसून येते की, जनता भाजपच्या ३० वर्षांच्या कुशासनाला कंटाळली आहे आणि आता त्यातून त्यांना सुटका हवी आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने केलेले काम लोकांना आवडले आहे आणि आता त्यांना गुजरातमध्येही तेच काम हवे आहे. 

"गुजरातमध्ये दोन जागांवर निवडणुका झाल्या. भाजप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. पण तरीही एका जागेवर आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला आणि दुसऱ्या जागेवर भाजपने विजय मिळवला. यावरून स्पष्ट होते की, गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. भाजपने आमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा जनतेने आम्हाला पुन्हा जिंकून दिली आहे," असेही केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक 2024Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाGujaratगुजरातPunjabपंजाब