केजरीवाल यांना झेड प्लस सुरक्षा
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:20+5:302015-02-11T00:33:20+5:30
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांतर्फे मंगळवारी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली. या झेड प्लस सुरक्षेअंतर्गत १२ सशस्त्र कमांडो केजरीवाल यांना सुरक्षा प्रदान करतील. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एस. बी. के. सिंग यांनी ही माहिती दिली.

केजरीवाल यांना झेड प्लस सुरक्षा
न ी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार असलेले आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांतर्फे मंगळवारी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली. या झेड प्लस सुरक्षेअंतर्गत १२ सशस्त्र कमांडो केजरीवाल यांना सुरक्षा प्रदान करतील. दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एस. बी. के. सिंग यांनी ही माहिती दिली.झेड प्लस सुरक्षा कवच मिळाल्याने केजरीवाल यांच्या निवासस्थानी सशस्त्र गार्ड तैनात करण्यात येतील आणि त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना धातू शोधक यंत्र बसविलेल्या दारातून जावे लागेल. शिवाय केजरीवाल जेथे जातील तेथे त्यांच्यासोबत एक पायलट कार आणि दोन एस्कॉर्ट कार असतील. केजरीवाल हे १४ फेब्रुवारी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची श्पथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ७० पैकी ६७ जागा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)