शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
4
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
5
बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
6
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
7
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
8
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
9
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
10
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
11
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
12
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
13
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
14
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
15
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
16
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
17
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
18
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
19
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
20
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक

"केजरीवाल फायटर आहेत, कायद्याची मदत घेऊ आणि मोदींच्या डावपेचाला आम्ही पुरून उरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 04:57 IST

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया : कितीही आडवा विकासाची कामे होतीलच

विकास झाडे नवी दिल्ली : संपूर्ण देशात मोदी मॉडेलची कुठेही चर्चा नाही. चर्चा होते ती केवळ केजरीवाल मॉडेलची. त्यामुळेच मोदी सरकार घाबरले आहे आणि असुरक्षितता वाटणाऱ्या मोदींनी दिल्ली सरकारच्या योजनांना अपयशी ठरविण्यासाठीच संसदेत विधेयक पारित केले; परंतु केजरीवाल फायटर आहेत, कायद्याची मदत घेऊ आणि मोदींच्या डावपेचाला आम्ही पुरून उरू, असा विश्वास उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्यक्त केला.

केजरीवाल सरकारला अडवणारे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (सुधारणा) विधेयक -२०२१ संसदेत मंजूर झाले आहे आता त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या कायद्यामुळे दिल्ली सरकारला प्रत्येक योजनांना मूर्तरूप देण्यासाठी नायब राज्यपालांवर अवलंबून राहावे लागेल. दिल्ली सरकारने या विधेयकाला कायम विरोध केला होता. परंतु नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ करणारे हे विधेयक राज्यसभेने मंजूर केले. विधेयकावरील चर्चेदरम्यान बऱ्यापैकी गदारोळ झाला. आप, काँग्रेससह चार पक्षांनी निषेध नोंदविला आणि सभागृहातून बाहेर पडले, परंतु उपसभापतींनी विधेयकाच्या बाजूने बहुमताने ते मंजूर केले. यापूर्वी २२ मार्च रोजी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले होते.

मोदींच्या कृतीचा सिसोदिया यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, केजरीवाल सरकारने गेल्या सहा वर्षांमध्ये खूप कामे केलीत. केवळ दिल्लीतच नव्हे तर जगामध्ये केजरीवाल मॉडेलची चर्चा व्हायला लागली आहे. जगात उत्तम काय चालले हे पाहण्यासाठी भारतातून शिष्टमंडळ विविध देशांमध्ये जायचे. आता जगातील लोक दिल्लीत येतात. इथल्या सरकारी शाळा पाहतात. मोहल्ला क्लिनिक किती उत्तम आहेत याचे कौतुक करतात. दिल्लीत वीज तयार होत नाही तरीही ७३ टक्के लोकांना मोफत वीज मिळते. प्यायला शुद्ध पाणी मिळते. 

घरपोच रेशन योजनेत केंद्राने खोडा घातलाभाजप सरकारला देशात आणि कोणत्याही राज्यात यातील एकही गोष्ट करता आली नाही. घरपोच रेशन योजनेत केंद्राने खोडा घातला. कारण मोदींचे मॉडेल चोरीचे आहे. गरिबांना घरपोच सेवा मिळावी असे वाटत नाही. यापुढे केजरीवाल सरकारच्या योजना कशा अपयशी होतील किंवा हे अधिकार दिल्ली सरकारचे नाहीत म्हणून अडविले जातीला याचाच प्रयत्न मोदींकडून होणार आहे. घाबरलेल्या मोदींची अडवण्याची भूमिका असेल त्यांची जिरवण्याची ताकद दिल्लीकरांमध्ये आहे. दिल्लीतील लोक आमच्यासोबत आहे. कायद्याची मदत घेऊन आम्ही विकासाची कामे मोदींना थोपवू देणार नाही, याकडेही सिसोदिया यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी