केजरीवाल बॉक्स

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:03+5:302015-02-14T23:52:03+5:30

बॉलिवूडची हजेरी

Kejriwal box | केजरीवाल बॉक्स

केजरीवाल बॉक्स

लिवूडची हजेरी
रामलीला मैदानावरील अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला हिंदी चित्रसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. आपच्या तिकिटावर अनुक्रमे चंदीगड आणि लखनौमधून लोकसभा निवडणूक लढविणारे गुल पनाग आणि जावेद जाफरी यांचा यात समावेश होता. अभिनेता अयुब खान, शेखर सुमन हे सुद्धा या सोहळ्याचे साक्षीदार होते.
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची गर्दी
आयआयटी खडकपूरमधील अरविंद केजरीवाल यांच्या मित्रांसह आयआयटीचे अनेक माजी विद्यार्थी आवर्जून हा सोहळा बघण्यासाठी रामलीला मैदानावर पोहोचले होते. केजरीवाल यांचे शिक्षण आयआयटी खडकपूरमध्ये झाले असल्याने या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मनात केजरीवाल यांच्याबद्दल जिव्हाळा आहे.

Web Title: Kejriwal box