शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

दिल्ली सरकारचा कौतुकास्पद निर्णय! येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनं वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 5:59 PM

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

वायू प्रदुषणाच्या मुद्द्यावर दिल्लीतील 'आम आदमी पक्षा'च्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ६ महिन्यात दिल्ली सरकारमधील प्रत्येक वाहन हे इलेक्ट्रीक वाहन असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी केली आहे. यासोबत सामान्य नागरिकांनीही इलेक्ट्रीक वाहन (electric vehicle) वापरावं याचं प्रोत्साहन देण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात केजरीवालांनी केली आहे. 

दिल्लीत एकूण १०० चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी टेंडर काढली जात असल्याचंही केजरीवाल यांनी गुरुवारी जाहीर केलं. आतापर्यंत दिल्लीत ६ हजार इलेक्ट्रीक वाहनांची विक्री झाली असून यासाठी खरेदीदारांना सबसिडी देखील देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहन हे एक जनआंदोलन व्हायला हवं. तरच दिल्लीकरांना प्रदुषणातून मुक्ती मिळू शकते. दिल्लीचं सरकार यासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेत आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं. 

पाहा काय म्हणाले केजरीवाल?

देशातील मोठमोठ्या कार निर्मात्या कंपन्यांनीही इलेक्ट्रीन वाहन निर्मितीसाठी पुढाकार घ्यायला हवा. यासोबतच देशातील युवा जेव्हा आपलं पहिलं वाहन खरेदी करतो तेव्हा ते इलेक्ट्रीक वाहन खरेदी करायला हवं, असंही केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकार दुकाची आणि तीनचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदीवर ३० हजारांपर्यंत तर चारचाकी इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना १.५ लाखांची सबसिडी देत आहे. इतकंच नव्हे, तर इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना खरेदीदाराला कोणताही रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्क भरावं लागत नाही. 

राजधानी दिल्लीत प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रदुषणाच्या समस्येशी लढण्याचं आव्हान दिल्ली सरकारसमोर उभं ठाकलं आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक कार्यक्रमांवर दिल्ली सरकार भर देत आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारdelhiदिल्लीAAPआप