केजरीवाल नमले, बाँड भरण्यास राजी

By Admin | Updated: May 27, 2014 16:23 IST2014-05-27T16:23:52+5:302014-05-27T16:23:52+5:30

गडकरी बदनामीप्रकरणी आपण काहीही गुन्हा केला नसल्यामुळे १० हजार रुपयांचा बाँड भरून जामीन घेण्यास नकार देणारे अरविंद केजरीवाल आता नरमले आहेत.

Kejriwal agreed to fill the bond, Namla | केजरीवाल नमले, बाँड भरण्यास राजी

केजरीवाल नमले, बाँड भरण्यास राजी

 नवी दिल्ली, २७ - गडकरी बदनामीप्रकरणी आपण काहीही गुन्हा केला नसल्यामुळे १० हजार रुपयांचा बाँड भरून जामीन घेण्यास नकार देणारे अरविंद केजरीवाल आता नरमले आहेत. एक आठवडा तुरुंगात काढल्यानंतर दिल्ली हायकोर्टाचा सल्ला मान्य करत आपण वैयक्तिक जातमुचलका भरण्यास केजरीवाल तयार झाले आहेत.

सत्र न्यायालयामध्ये बाँड न भरल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जी नंतर आणखी वाढली. केजरीवाल यांच्यावतीने हायकोर्टात दाद मागण्यात आली. यावेळी हायकोर्टाने केजरीवाल यांची कानउघाडणी करताना जामीन अर्ज व बाँड या कायदेशीर बाबी असल्याचे सांगितले व त्याला पर्याय नसल्याचे सुनावले. कुठलाही पुरावा नसताना गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत कोर्टाने केजरीवाल यांच्या कानउघाडणी केली आहे.

अखेर हायकोर्टाचा सल्ला ऐकत केजरीवाल जामीनावर तुरुंगातून सुटण्यासाठी बाँड भरण्यास तयार झाले आहेत.

Web Title: Kejriwal agreed to fill the bond, Namla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.