शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

केजरीवाल जोड :

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

सिसोदियांनी घेतला पत्रपरिषदेतून काढता पाय

सिसोदियांनी घेतला पत्रपरिषदेतून काढता पाय
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टी(आप)सरकारने सोमवारी पत्रकारांशी नाराजी ओढवून घेतली़ पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेल्या पत्रपरिषदेत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पत्रकारांत खडाजंगी उडाली़ यानंतर सिसोदिया पत्रपरिषद सोडून निघून गेले़
आप सरकारने मीडियाला सचिवालयात जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप पत्रकारांनी यानिमित्ताने केला़ पत्रकारांना सचिवालयाच्या आत जाण्यापासून रोखण्यात आले़ यात मान्यताप्राप्त पत्रकारांचाही समावेश होता़ मंत्रिमंडळाची बैठक आटोपून बाहेर आलेले मनीष सिसोदिया यांच्याकडे पत्रकारांनी याबाबत तक्रार नोंदवली़ पत्रकारांनी सिसोदिया यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला़ मात्र सिसोदिया यांनी या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला़
दरम्यान, आम आदमी पार्टीने पत्रकारांना सचिवालयात परवानगी नाकारल्याच्या मुद्यावर कानावर हात ठेवले़ हा निर्णय सचिवालयात आधीपासून काम करणार्‍या अधिकार्‍यांचा होता़ पत्रकारांना माहिती देण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे़ मात्र याउपरही सरकार अधिकार्‍यांशी चर्चा करून या मुद्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करेल, असे पक्षप्रवक्ते आतिशी मलेर्ना यांनी सांगितले़