सहेतुक कजर्बुडव्यांना बाजारापासून दूर ठेवा
By Admin | Updated: July 30, 2014 01:25 IST2014-07-30T01:25:11+5:302014-07-30T01:25:11+5:30
जाणूनबुजून कजर्बुडवेगिरी करणा:यांना बाजारातून भांडवल गोळा करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस बँकेने सेबीकडे केली आहे.

सहेतुक कजर्बुडव्यांना बाजारापासून दूर ठेवा
नवी दिल्ली : बँकांचा पैसा बुडवणा:यांविरोधात रिझव्र्ह बँकेने कडक भूमिका घेतली आहे. जाणूनबुजून कजर्बुडवेगिरी करणा:यांना बाजारातून भांडवल गोळा करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस बँकेने सेबीकडे केली आहे.
सूत्रंनी सांगितले की, रिझव्र्ह बँक जाणूनबुजून कजर्बुडवेगिरी करणा:या संस्थांबाबत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड, अर्थात सेबीला तात्काळ सविस्तर माहिती देण्याच्या पद्धतीबाबत विचार करत आहे. रिझव्र्ह बँकेची ही शिफारस अमलात आल्यास अशा संस्थांना सेबीच्या अधिकार क्षेत्रतील शेअर आणि अन्य बाजारातून भांडवल जमा करण्यापासून रोखले जाऊ शकते.
यासंदर्भात अजून सेबीद्वारे विचार केला जाणो बाकी असून सध्याचे कायदेकानू आणि विविध संबंधित संस्थांशी विचारविनिमय करून यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. सध्या जाणूनबुजून कजर्बुडवेगिरी करणा:यांची माहिती तिमाही आधारावर रिझव्र्ह बँकेकडून दिली जाते. ज्या कंपन्यांकडे कर्जे थकली आहेत, त्यात हेतूत: कर्ज थकविणा:यांची संख्याच अधिक असल्याचे रिझव्र्ह बँकेला आढळून आले आहे. कोटय़वधींचे कर्ज घ्यायचे आणि नंतर सेटलमेंटसाठी अर्ज करायचा असे सुरू आहे. कर्जाऊ घेतलेल्या रकमा या कंपन्यांकडून बेकायदेशीररीत्या रिअल इस्टेट आणि अल्पावधित मोठा परतावा देणा:या व्यवसायाकडे वळवितात, असेही आढळून आले आहे. सेटलमेंटमध्ये बँकांना अत्यल्प मोबदला मिळतो. व्याजाच्या मोठय़ा रकमेवर पाणी सोडावे लागते. तसेच यातून बँकांचे अनुत्पादक भांडवलही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. सगळ्यांत गंभीर बाब म्हणजे कर्जबुडव्यांवर कारवाई होत नसल्यामुळे जाणूनबुजून कर्ज बुडविणा:यांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर आरबीआयकडून हा प्रस्ताव आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्सध्या कर्ज न भरता अन्य स्रोतांद्वारे भांडवल जमविण्यास रोखण्यासाठी संबंधित संस्थेचे नाव आणि माहिती वास्तविक वेळेच्या आधारावर उपलब्ध करून देण्याचा आरबीआयचा मानस आहे.
च्अशा संस्थेचे आरबीआयद्वारा नाव घोषित झाल्यानंतर तिला अन्य स्रोतांद्वारे कर्ज मिळू नये या उद्देशाने ही वाटचाल सुरू आहे.