शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचे वचन पाळा; संघाचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:57 IST

आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन रविवारी येथे केले.रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या ‘धर्मसंसदे’त बोलताना जोशी म्हणाले की, देशाला रामराज्याची आस लागली आहे. आमचा कोणत्याही समाजाशी झगडा नाही. आम्ही राम मंदिरासाठी याचना करतो आहोत, असेही नाही. आज सत्तेत बसलेल्यांनी राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. देशातील जनतेच्याही तशाच तीव्र भावना आहेत. त्यामुळे सरकारने जनभावनांचा आदर आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.जोशींखेरीज विहिंपचे अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे व त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्याखेरीज सर्वच वक्त्यांनी राम मंदिराची मागणी पूर्ण होईपर्यंत हे जनआंदोलन सुरूच ठेवण्याची ग्वाही दिली. गेल्या २५ नोव्हेंबरला विहिंपने अयोध्या, नागपूर व मंगळुरूसह देशात सात ठिकाणी अशाच धर्मसभांचे आयोजन केले होते. याच मालिकेतील शेवटची ‘धर्मसंसद’ ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी प्रयाग क्षेत्री व्हायची आहे.दबावासाठी शक्तिप्रदर्शनसंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी विहिंपने राम मंदिरासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केले. आयोजकांनी पाच लाख लोक आल्याचा दावा केला असला तरी रामलीला मैदानावर पार्किंग हटविले तर जास्तीत जास्त लाखभर लोक मावू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याखेरीज वाहतुकीवरही निर्बंध घातले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा