शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर खडा पहारा, लष्कराला मिळाली अत्याधुनिक नाैका आणि स्वदेशी शस्त्रे, पाकवरही डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 07:00 IST

विशेष म्हणजे, हे सर्व साहित्य संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. त्यात नव्या एक २०३ रायफलचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराची क्षमता यामुळे वाढणार आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कराला अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे साेपविण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीमध्ये ही स्वदेशी हत्यारे सोपवली आहेत.  विशेष म्हणजे, हे सर्व साहित्य संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे. त्यात नव्या एक २०३ रायफलचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला उत्तर देण्यासाठी लष्कराची क्षमता यामुळे वाढणार आहे.

लष्कराला साेपविलेल्या लष्करी सामग्रीमध्ये एन्टी पर्सनल माईन ‘निपुण’, एके-२०३ रायफल, एफ अन्सास रायफल्स, थर्मल इमेजर, रणगाड्यांसाठी आधुनिक दृष्टी यंत्रणा यांच्यासह ड्रोन्स यांचा समावेश आहे. नवी एके-२०३ रायफल आणि त्यामुळे सैन्यदलाला होणाऱ्या फायद्याचे सादरीकरणही सैनिकांकडून प्रात्यक्षिकाद्वारे संरक्षणमंत्र्यांसमाेर सादरीकरण करण्यात आले.

तसेच वास्तविक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्सही भारतीय सैन्यदलाला आज देण्यात आले आहेत. या ड्रोन्समुळे दुर्गम भागातील शत्रूराष्ट्रांच्या सीमा आणि सैन्यदलावर नजर ठेवता येणे आता भारतीय सैन्याला सहज शक्य होणार आहे.

लँडिंग क्राफ्ट असॉल्टचे प्रात्यक्षिकपूर्व लडाखच्या सीमेजवळच्या पँगॉँग तलावामध्ये चीनकडून पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या ठिकाणी भविष्यात उद्भवू शकणाऱ्या आव्हानांचा विचार करून लष्कराला दिलेल्या ‘लँडिंग क्राफ्ट असाॅल्ट’ नाैकेचे प्रात्यक्षिकही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाखवण्यात आले. या नाैकेत एका वेळी ३५ सशस्त्र सैनिक प्रवास करू शकतात.  अत्यंत कमी वेळेत ते या तलावात कोणत्याही ठिकाणी पोहचू शकणार आहेत. अशा १२ नाैका लष्कराला मिळणार आहेत.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत