शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:51 IST

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ यात्रा मार्गावर हेलिकॉप्टर कोसळले, यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ आज एक हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, यामध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी आहेत. दरम्यान, आता हेलिकॉप्टर सेवेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातावर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश

गौरीकुंडला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, याचा परिणाम आता चारधाम यात्रेच्या हेलिकॉप्टर सेवेवरही झाला आहे. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश पाळला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचे बळी ठरलेले प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

उत्तराखंडमधील वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कडक आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, 'राज्यात हेली सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी तयार करावी, यामध्ये उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती पूर्णपणे तपासली पाहिजे.' याशिवाय, हवामानाची अचूक माहिती असणे देखील बंधनकारक करावे. मुख्यमंत्री धामी यांनी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती हेली ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंचा आढावा घेतल्यानंतर एसओपी तयार करेल.

पायलटसह सात जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये पुन्हा हेलिकॉप्टर अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्राती भाविकांचाही समावेश आहे.

सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह ७ जण विमानात होते. हेलिकॉप्टरमध्ये राजवीर (पायलट), विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी (वय १० वर्षे) असे प्रवासी होते. केदारनाथ येथे दाट धुके आणि जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर रस्ता चुकले. त्यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते कोसळल्याचे म्हटलं जात आहे.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAccidentअपघात