केसीई संस्था करणार दोन चौकांचे सुशोभिकरण आयुक्तांसह नंदकुमार बेंडाळे यांनी केली पाहणी : आरखडा तयार करण्याचे आदेश
By Admin | Updated: March 15, 2016 00:32 IST2016-03-15T00:32:20+5:302016-03-15T00:32:20+5:30
जळगाव: आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांमध्ये अडथळा येत असलेल्या मनपाच्या मदतीसाठी आता केसीई संस्थाही सरसावली असून मुजे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकाचे तसेच अग्रवाल हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी मनपाला दिला. त्यानुसार आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी स्वत: त्यांच्यासह या चौकांची पाहणी करून मनपा अभियंत्यांना आरखडा तयार करण्याचे आदेश दिले.

केसीई संस्था करणार दोन चौकांचे सुशोभिकरण आयुक्तांसह नंदकुमार बेंडाळे यांनी केली पाहणी : आरखडा तयार करण्याचे आदेश
ज गाव: आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांमध्ये अडथळा येत असलेल्या मनपाच्या मदतीसाठी आता केसीई संस्थाही सरसावली असून मुजे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकाचे तसेच अग्रवाल हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी मनपाला दिला. त्यानुसार आयुक्त संजय कापडणीस यांनी सोमवारी स्वत: त्यांच्यासह या चौकांची पाहणी करून मनपा अभियंत्यांना आरखडा तयार करण्याचे आदेश दिले. मु.जे. महाविद्यालयासमोरील चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. संस्थेच्या या ठिकाणी असलेल्या महाविद्यालय व शाळांमधील सुमारे १३-१४ हजार विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी होत असते. अपघात होऊ नयेत, अशा पद्धतीने या चौकाचे विस्तारीकरण व सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव केसीई संस्थेच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी दिला. भोईटे मार्केटजवळील गटारीची लेव्हल रस्त्याच्या लगत आली असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यात नगररचना विभागाच्या नियमानुसार आयुक्तांनी सोमवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच मनपाच्या अभियंत्यांना चौकाच्या रुंदीकरणाच्या व सुशोभिकरणाच्यादृष्टीने नकाशे बनविण्याच्या सूचना दिल्या. तसेच याच रस्त्यावरील अग्रवाल हॉस्पिटलजवळील महामार्गावरील चौकात विद्यार्थ्यांचे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गा विभागाची परवानगी घेऊन या चौकाचेही सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव बेंडाळे यांनी दिला आहे.