शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अडीच वर्षांपासून पेन्शन बंद, आई जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी दिव्यांग मुलाची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 20:14 IST

अधिकाऱ्यांनी एका वृद्ध महिलेला कागदावर मृत दाखवून तिची पेन्शन बंद केली. हा प्रकार महिलेला समजताच तिने कार्यालयात धाव घेतली. पण तोडगा निघाला नाही.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी एका वृद्ध महिलेला कागदावर मृत दाखवून तिची पेन्शन बंद केली. हा प्रकार महिलेला समजताच तिने कार्यालयात धाव घेतली. पण तोडगा निघाला नाही. आपण जिवंत असल्याचं दाखवण्यासाठी वृद्ध महिला गेल्या अडीच वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत होती, मात्र तिचं कोणीच ऐकलं नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे संपूर्ण प्रकरण कौशांबीच्या मंझनपूर तहसीलमधील कटिपार गावातील आहे, जिथे ७० वर्षीय राजकुमारी देवी यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या घरी एक दिव्यांग मुलगाही आहे. राजकुमारी देवी यांना कागदोपत्री मृत दाखवून अधिकाऱ्यांनी वृद्धापकाळ पेन्शन  बंद केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीनंतर कठोर कारवाई करण्याचे आदेश डीएमने दिले आहेत.

आता राजकुमारी या स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून विकास भवनाच्या फेऱ्या मारत आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा, राजकुमारी आपल्या दिव्यांग मुलासह त्याच्या ट्रायसायकलवरून अधिकाऱ्यांकडे येतात आणि तक्रार नोंदवतात. जिल्ह्यातील उच्चपदस्थांच्या कार्यालयात जाऊनही कोणीच ऐकत नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे

पेन्शन बंद झाल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. मात्र एकही अधिकारी दखल घेत नाही. त्याचवेळी त्यांचा दिव्यांग मुलगा राम बहादूर सांगतो की, माझ्या आईला पेन्शन मिळायची, त्यामुळे घरखर्च भागत असे. अडीच वर्षांपासून माझ्या आईला समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदावर मृत दाखवलं, त्यानंतर मी माझ्या आईला ट्रायसायकलवर घेऊन ३० किलोमीटर अंतरावरील अधिकाऱ्यांकडे आलो, पण कोणीही ऐकत नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPensionनिवृत्ती वेतन