शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कटप्पा रणांगणात... पुतळे तोडणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना लढाईचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 11:08 IST

पेरियार हे केवळ एक मूर्ती नव्हेत. ते केवळ हाडामांसांने बनलेले शरीरही नाही. तर पेरियार हा एक विचार आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून साम्यवादांचा आदर्श असणाऱ्या लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला होता. देशभरात या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे भाजपा आणि विरोधकांकडून एकमेकांच्या आदर्श नेत्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे सत्र सुरू झाले होते. कालच मेरठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तर तामिळनाडूत काही समाजकंटकांनी समाजसुधारक पेरियार यांच्या पुतळ्याची नासधुस केली होती. या पार्श्वभूमीवर 'बाहुबली' चित्रपटातील कटप्पा फेम अभिनेता सत्यराज यांनी भाजपाला फटकारले आहे. सत्यराज यांनी एका चित्रपटात पेरियार यांची भूमिकाही साकारली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. या व्हिडिओत त्यांनी म्हटले आहे की, त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याच्या घटनेचा मी निषेध करतो. तामिळनाडूतील भाजपा नेते एच.राजा यांनीदेखील पेरियार यांचा पुतळा पाडण्याची भाषा केली होती. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे. पेरियार हे केवळ एक मूर्ती नव्हेत. ते केवळ हाडामांसांनी बनलेले शरीरही नाही. तर पेरियार हा एक विचार आहे. कष्टकरी आणि महिलांच्या स्वातंत्र्यासाठीची आणि अंधविश्वास संपविणारी ती एक विचारधारा आहे. त्यामुळे पेरियार नेहमी आपल्या मनात राहतील, असे सत्यराज यांनी व्हिडिओत म्हटले आहे. तसेच आम्ही पेरियार विरोधकांचे आव्हान स्वीकारत असल्याचेही त्यांनी म्हटले. विरोधकांनी केवळ आम्हाला दिवस आणि तारीख सांगावी. एच.राजा यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे. अन्यथा तामिळनाडू सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, असे सत्यराज यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाstatue Vandalismपुतळ्यांची विटंबना