काटोल... निधी
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:40+5:302015-02-15T22:36:40+5:30
काटोल, नरखेड क्षेत्रातील रस्ते व पुलांसाठी निधी मंजूर

काटोल... निधी
क टोल, नरखेड क्षेत्रातील रस्ते व पुलांसाठी निधी मंजूरग्रामस्थांना दिलासा : आशिष देशमुख यांच्या प्रयत्नांना यशकाटोल : काटोल, नरखेड क्षेत्रातील रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून प्रस्ताव व निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आ.डॉ. आशिष देशमुख यांनी या विकास कामांसाठी सतत पाठपुरावा केला होता. रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी शासनाने निधी मंजूर केल्याने दोन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. सावरगाव-नरखेड-मोवाड-पुसला या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीसाठी २० कोटी, काटोल-मूर्ती-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १५ कोटी, कारंजा-भारसिंगी-मोवाड-भानगाव या रस्त्यांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी १९ कोटी, भिष्णूर-खंडाळा-सावरगाव-पिपळा या रस्त्यासाठी १०.३९ कोटी तसेच वरुड-जलालखेडा-काटोल-नागपूर मार्गावरील दोन मोठ्या पुलांसाठी सात कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. रस्ते बांधकामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे या क्षेत्रातील विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. क्षेत्राचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी विकास कामांसाठी सतत पाठपुरावा करून अनेक योजना खेचून आणण्याचा प्रयत्न केला. सदर निधीसाठी त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. (तालुका प्रतिनिधी)