काटोल....

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:02+5:302014-12-25T22:41:02+5:30

फोटो...

Katol .... | काटोल....

काटोल....

टो...
बोरगोंदी येथे संत नाना महाराज पुण्यतिथी सोहळा
नागपूर : काटोलनजीकच्या ऋषिधरी बोरगोंदी येथे श्रीसंत नाना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे २६ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याची सुरुवात दिनकर अलोणे महाराज यांच्या श्रीमद्भागवत प्रवचनाने केली जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सूचक, सरपंच इंदिरा राऊत, विनायक पोहकार, मिलिंद पाटील, हिरामण थेटे, धनूजी वंजारी यांची उपस्थिती राहील. उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच दररोज भजन, पूजन, आरती तसेच विविध महाराजांचे प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. २ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीमद्भागवत प्रवचन होईल. त्यानंतर दिनकर अलोणे यांचे काल्याचे कीर्तन होईल. प्रसंगी दहीहंडी व घट विसर्जनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाईल. उत्सवाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र ऋषिधरी आश्रम देवस्थान पंचकमिटीने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Katol ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.