कासव तस्कराला अटक

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:32+5:302015-08-12T23:54:32+5:30

३२ कासव जप्त : वनविभागाची कारवाई

Kaskav arrested for tuition | कासव तस्कराला अटक

कासव तस्कराला अटक

कासव जप्त : वनविभागाची कारवाई
नागपूर : कासवाची अवैध विक्री करणाऱ्या तस्कराला वनविभागाने अटक केली असून, त्याच्याकडून ३२ कासव जप्त करण्यात आले आहे. बुधवारी ही कारवाई बैद्यनाथ बसस्थानक परिसरात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अर्पित गाणार आहे. तो कमाल चौक परिसरात मत्स्यालय चालवितो. गाणार कासवांची अवैध विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. बुधवारी कासवाची विक्री होणार असून ३० हजार रुपयात सौदा पक्का झाल्याची पक्की माहिती अधिकाऱ्यांना लागली. बसस्थानक परिसरातील डालडा फॅक्टरी जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्सने आलेले कासव अर्पित गाणारने आपल्या ताब्यात घेताच, पाळतीवर असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्याला अटक केली. हे कासव राजनांदगाव (छत्तीसगड) येथून त्याने मागविले होते. जप्त केलेल्या कासवांमध्ये टेरापीन, इंडियन स्टार्ड व अन्य प्रजातीच्या कासवांचा समावेश आहे. या कारवाईत डीएफओ (व्हिजीलन्स) पी.डी. मेश्राम, आरएफओ डी.बी. वाघ, मनोज मोहिते, तायडे, मंगल, कुंदन हाते, विनित अरोरा आदी सहभागी होते. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला गुरुवारी कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Kaskav arrested for tuition