शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 5:32 AM

स्लीपर सेल म्हणून सक्रिय झाल्याची भीती

श्रीनगर : पाकिस्तानात व्हिसा घेऊन गेलेले सुमारे १०० हून अधिक काश्मिरी तरुण बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी धाेक्याचा इशारा दिला आहे. हे तरुण सीमेपलीकडून देशविघातक कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल म्हणून काम करीत असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हंडवारा येथील जंगलात उडालेल्या चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला हाेता. त्यापैकी एक तरुण काश्मीरचाच रहिवासी हाेता. ताे २०१८ मध्ये अल्प काळासाठी पाकिस्तानात गेला हाेता. त्यानंतर ताे परतलाच नव्हता, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी त्यावेळी दिली हाेती. गेल्या वर्षी १ ते ६ एप्रिल या कालावधीत शाेपियान, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील अनेक तरुण घुसखाेरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाेबत आढळले हाेते. ते सर्व जण याेग्य कागदपत्रांसह पाकिस्तानात गेले हाेते. मात्र, परतलेच नव्हते. पाकिस्तानात गेलेले अनेक तरुण एक तर परतलेच नाहीत किंवा परतल्यानंतर बेपत्ता झाले. ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्लीपर सेल्स म्हणून काम करीत असल्याचा संशय आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तानातून परतलेल्यांच्या चाैकशीतून माहिती उघडबेपत्ता असलेले तरुण काश्मिरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. नियंत्रण रेषेवर वाढविण्यात आलेल्या बंदाेबस्तामुळे स्फाेटके व इतर साहित्य न पाेहाेचल्यामुळे ते सध्या शांत बसले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दाेन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून परतलेल्यांची चाैकशीही केली हाेती. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी संघटनांनी तरुणांचे माेठ्या प्रमाणावर ब्रेनवाॅश करून तरुणांची भरती केली. त्यांच्यासाठी ६ आठवड्यांचे प्रशिक्षणही हाेते. काही तरुणांना सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बाॅम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादी