काश्मिरातील जवान रायफलीसह झाला फरार

By Admin | Updated: July 7, 2017 01:52 IST2017-07-07T01:52:56+5:302017-07-07T01:52:56+5:30

जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्करातील जवान झहूर ठाकूर हा एके ४७ रायफलसह फरार झाला असून, तो दहशतवाद्यांना जाऊन मिळाला असावा,

Kashmiri youth escapes with rifle | काश्मिरातील जवान रायफलीसह झाला फरार

काश्मिरातील जवान रायफलीसह झाला फरार

श्रीनगर : जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्करातील जवान झहूर ठाकूर हा एके ४७ रायफलसह फरार झाला असून, तो दहशतवाद्यांना जाऊन मिळाला असावा, असा संशय आहे. जवान झहूर ठाकूर हा १७३, जम्मू-काश्मीर क्षेत्रीय लष्कराच्या बारामुल्ला येथील इंजिनीअरिंग विंगमध्ये तैनात होता. ठाकूरची वागणूक संशयास्पद असल्याचे आढळून आले होते.
झहूर ठाकूर हा पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असून, त्याच्या शोधासाठी ज्ञात-अज्ञात ठिकाणी, घराघरांत जाऊन सुरक्षा दल चौकशी करत आहे. पुलवामा जिल्हा हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला मानला जातो. झहूर ठाकूर हा दहशतवाद्यांना जाऊ न मिळाल्याचा संशय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याआधी पोलीस दलातून शस्त्रासह काही पोलीस पळाल्याचे प्रकार काश्मीर खोऱ्यात घडले आहेत. त्यांचाही दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे दिसून आले होते. शिवाय पोलीस व जवानांची शस्त्रास्त्रे हिसकावून घेऊन फरार होण्याच्या घटनाही तिथे घडल्या आहेत. मे महिन्यामध्ये पोलिसांच्या चार रायफली घेऊन एक शिपाई फरार झाला होता. त्याच्या दुसऱ्याच  दिवशी हिजबुल मुजाहिद्दीनने सदर पोलीस शिपाई शस्त्रांसह आम्हाला येऊन मिळाल्याचे जाहीर केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Kashmiri youth escapes with rifle