शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खो-यात जवानांवर दगडफेक करणा-यांना मिळणार 'माफी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:41 IST

काश्मीर खो-यात पहिल्यांदा दगडफेक करणा-यांना माफी देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देएफआयआर रद्द झाल्यामुळे या युवकांना नव्याने आयुष्यात उभे राहता येईल अशी आशा आहे असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

श्रीनगर - काश्मीर खो-यात पहिल्यांदा दगडफेक करणा-यांना माफी देण्याचा निर्णय जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी घेतला आहे. पहिल्यांदा दगडफेक करणा-या युवकांवरील एफआयआर मागे घेण्याची प्रक्रिया सुरु करताना मला प्रचंड समाधान मिळत आहे असे मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी रात्री केलेल्या टि्वटमध्ये म्हटले होते. माझ्या सरकारने मे 2016 मध्येच ही प्रक्रिया सुरु केली होती. पण त्यानंतर खो-यातील परिस्थिती बिघडत गेल्याने मला एफआयआर मागे घेण्याची प्रक्रिया थांबवावी लागली. 

एफआयआर रद्द झाल्यामुळे या युवकांना नव्याने आयुष्यात उभे राहता येईल अशी आशा आहे असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमध्ये चर्चेसाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले प्रतिनिधी दिनेश्वर शर्मा यांनी सुद्धा एफआयआर मागे घेण्याची शिफारस केली होती. खो-यातील जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा हा त्यामागे उद्देश होता. 

काश्मीर खो-यात हिंसाचार आता बराच कमी झाला आहे. काही महिन्यांपूर्वी येथील युवक जवानांवर दगडफेक करायचे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु असताना दगडफेक करुन व्यत्यय आणला जायचा. काहीवेळा या दगडफेकीमुळे दहशतवादीसुद्धा निसटले.   केंद्र सरकारने लष्कराच्या मदतीने काश्मीरमधील परिस्थितीवर मोठया प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. 

काश्मीर खो-यातील हिंसाचाराच्या घटना संपल्यात जमा आहेत. पाकिस्तानचा काश्मीरमधील प्रभावही ओसरला आहे. एकूणच काश्मीरची विस्कटलेली घडी रुळावर येताना दिसत आहे. 2017 या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 202 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीर खो-यात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना स्थानिकांकडून मोठया प्रमाणावर पाठबळ मिळत होते. त्यामध्ये मोठया प्रमाणावर घट झाली आहे. सरकारने काश्मीरमधल्या परिस्थितीचे विश्लेषण केले त्यातून ही माहिती समोर आली आहे. सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथील लष्करी मुख्यालयावर केलेला हल्ला सोडल्यास दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कुठलीही मोठी कारवाई करता आलेली नाही. सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे पार मोडून टाकले आहे. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीTerrorismदहशतवाद