पाकव्याप्त काश्मिरी नेत्याचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 00:32 IST2015-07-11T00:32:01+5:302015-07-11T00:32:01+5:30
पाकव्याप्त काश्मीरचे चार वेळा अध्यक्षपद भूषविलेले सरदार अब्दुल कय्युम खान (९१) यांचे आजाराने शुक्रवारी निधन झाले.

पाकव्याप्त काश्मिरी नेत्याचे निधन
इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरचे चार वेळा अध्यक्षपद भूषविलेले सरदार अब्दुल कय्युम खान (९१) यांचे आजाराने शुक्रवारी निधन झाले.
पाकव्याप्त काश्मीरमधील जुना राजकीय पक्ष मुस्लिम कॉन्फरन्सचे खान प्रमुख होते. १९५६ मध्ये ते पहिल्यांदा या वादग्रस्त विभागाचे अध्यक्ष निवडले गेले. त्यानंतर १९७१, १९८५ व १९९० मध्येही ते त्या पदावर निवडले गेले होते. नंतर त्यांची १९९६ मध्ये या भागाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.