काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकचे झेंडे
By Admin | Updated: May 2, 2015 10:25 IST2015-05-02T02:26:59+5:302015-05-02T10:25:30+5:30
भारतीय भूमीत काढलेल्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावल्याप्रकरणी मसरत आलम भटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेला महिना

काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकचे झेंडे
त्राल : भारतीय भूमीत काढलेल्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावल्याप्रकरणी मसरत आलम भटवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हुरियत नेते आणि फुटीरवादी सय्यद अली शाह गिलानी यांनी यांच्या त्राल येथील रॅलीत पाकिस्तानी झेंडे फडकल्याची घटना शुक्रवारी घडली.
तीन महिन्यांनंतर काश्मीरमध्ये परतलेले हुरियत कॉन्फरन्सचे नेते गिलानी चार आठवड्यांपूर्वीच्या अशाच घटनेमुळे नजरकैदेते होते. पण पोलिसांना गुंगारा देत ते शुक्रवारी त्राल येथे झालेल्या रॅलीत सहभागी झाले. या रॅलीत तब्बल १५ ते २० पाकिस्तानी झेंडे फडकत होते. या रॅलीत मसरत आलमही दिसल्याचे काहींचे म्हणणे आहे.