काश्मीर: पुलवामामध्ये चकमकीत दोन अतिरेकी ठार
By Admin | Updated: January 20, 2016 14:06 IST2016-01-20T13:21:25+5:302016-01-20T14:06:59+5:30
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये अतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.

काश्मीर: पुलवामामध्ये चकमकीत दोन अतिरेकी ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २० - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये अतिरेकी आणि सुरक्षापथकांमध्ये रात्रभर चाललेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. नैना बाटापोरा गावामध्ये अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ५३ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांनी या भागाला घेराव घातला होता.
जवान अतिरेकी लपलेल्या घराजवळ जाताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले.