शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:14 IST

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख Jitan Ram Manjhi यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.

पाटणा -  काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.  मांझी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधताना जर काश्मीर शांत करायचं असेल तर ते बिहारींकडे सोपवा असं विधान केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये १८ मार्चचं ट्विट रिट्विट करताना मांझी यांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, द काश्मीर फाईल्स चित्रपट हा एक दहशतवादी कट आहे. हा चित्रपट दाखवून काश्मीरमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतावादी कारवायांनी माझं म्हणणं खरं ठरवलं आहे. आता मी केवळ एवढंच सांगेन की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर काश्मीर बिहारींकचे सोपवा, सर्व काही ठीक होईल.

तत्पूर्वी जीतनराम मांझी यांनी १८ मार्च रोजी ट्विट करत द काश्मीर फाईल्स हा एक व्यापक कट असू शकतो. हा चित्रपट दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मण पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात येऊ नयेत. दरम्यान, या चित्रपटामधील युनिटच्या सदस्यांच्या दहशतवादी कनेक्शनचीही सरकारकडून तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादBiharबिहार