काश्मीर: तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, १ जवान शहीद

By Admin | Updated: November 25, 2015 12:20 IST2015-11-25T10:01:07+5:302015-11-25T12:20:57+5:30

जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या कॅम्पवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.

Kashmir: In Tangdhar sector, terrorists attack Army garb, 1 jawan martyr | काश्मीर: तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, १ जवान शहीद

काश्मीर: तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, १ जवान शहीद

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. २५ - जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या कॅम्पवर बुधवारी सकाळी जोरदार हल्ला चढवला असून त्यात एक जवान शहीद झाला आहे. सात ते आठ दहशतवाद्यांनी ३१ गोरखा रायफल्सच्या तळावर हल्ला चढवत गोळीबार सुरू केला असता लष्कराच्या जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देत कारवाई सुरू केली. सकाळपासूनच दहशतवादी व जवानांदरम्यान चकमक सुरू असून या हल्ल्यामुळे लष्कराच्या कॅम्पमध्ये मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कॅम्पच्या गेटवर हल्ला करत गोळीबार केला, ज्यामुळे मोठी आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न करत आहेत.

Web Title: Kashmir: In Tangdhar sector, terrorists attack Army garb, 1 jawan martyr