जम्मू काश्मीरात लष्करासोबत चकमकीदरम्यान दहशतवादी ठार

By Admin | Updated: June 17, 2016 11:02 IST2016-06-17T11:02:00+5:302016-06-17T11:02:00+5:30

सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे

In Kashmir, militants killed during the encounter with the army | जम्मू काश्मीरात लष्करासोबत चकमकीदरम्यान दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरात लष्करासोबत चकमकीदरम्यान दहशतवादी ठार

ऑनलाइन लोकमत - 
जम्मू काश्मीर, दि. 17 - सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सोपोरे सेक्टरमध्ये ही चकमक झाली असून दहशतवादी एका घराल लपून बसले होते. लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. अजून दोन दहशतवादी घरामध्ये लपले असल्याची शक्यता आहे.
 
काही दहशतवादी चना मोहल्ला परिसरातील एका घरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्करच्या जवानांनी घराला वेढा घातला होता. लष्कराच्या जवानांना पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. 
 
 

Web Title: In Kashmir, militants killed during the encounter with the army