शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 10:32 IST

पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात दिलेल्या प्रस्तावात राहुल गांधींच्या विधानाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तान राहुल गांधींचं नाव विनाकारण बदनाम करत आहे. जेणेकरून ते करत असलेले खोटे दावे खरे ठरतील. रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तानकडून राहुल गांधींसंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, याबद्दल जग साशंक नाही. पाकिस्ताननं किती खोट बोलण्याचा प्रयत्न केला तर सत्य बदलणार नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर आम्ही मोदी सरकारबरोबर असल्याचंही यापूर्वीच राहुल गांधींनी सांगितलं आहे. ते लिहितात, मी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी असहमत आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला गरज नाही. जम्मू-काश्मीरमध्ये झालेली हिंसा हीसुद्धा पाकपुरस्कृत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्यामुळे एवढी वर्षं जम्मू-काश्मीर अशांत होतं. जगभरातही पाकिस्तानला दहशतवाद्यांचं प्रमुख आश्रयस्थान असल्याच्या नजरेतूनच पाहिलं जातं.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीImran Khanइम्रान खान