शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्कूल चले हम...काश्मीरमध्ये पुन्हा फुलू लागल्या शाळा; २ वर्षांत पटसंख्येत लक्षणीय वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:56 IST

जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ सालापासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे.

श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ सालापासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, २०१९ पूर्वी तीन वर्षे जम्मू-काश्मीरमधील शाळांतल्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली होती; पण गेल्या दोन वर्षांत या विद्यार्थ्यांच्या संख्येत १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षण अर्धवट सोडलेल्या ८६ हजार मुलांना काश्मिरातील शाळांमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात येणार आहे.

श्रीनगर येथील आर्यपुत्री शाळेच्या वार्षिक समारंभामध्ये मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, १९१० मध्ये सुरू झालेल्या या शाळेने समाजातील वंचित वर्गातल्या मुलींना उत्तम शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले आहे. २०१९ सालानंतर काश्मीरमधील स्थितीत खूप चांगला बदल झाला आहे. या केंद्रशासित प्रदेशात शिक्षणाचा हक्क लागू करण्यात आला आहे. तेथील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी व चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी मागील दोन वर्षांत प्रशासनाने काही निर्णय घेतले आहेत. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे ३७० कलम २०१९ साली संसदेने रद्दबातल केले, तसेच जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. त्यानंतर या प्रदेशात सुधारणांसाठी केंद्र सरकारने आणखी वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. 

तलाश ॲपचा प्रभावी वापरकाश्मीरमध्ये गेल्या वर्षी १.६५ लाख विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण अर्धवट सोडले त्यांचा शोध घेण्यासाठी तलाश ॲपचा प्रभावी उपयोग करण्यात येत आहे. अशा ८६ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश देण्यात येईल.

१४ हजार मुलींना नीट परीक्षेचे कोचिंगजम्मू-काश्मीरमध्ये बालवाडीत प्रवेश देण्यासाठी १.२४ लाख बालकांची नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी काश्मीरमध्ये २ हजार किंटरगार्डन सुरू करण्यात येतील. या केंद्रशासित प्रदेशातील १४ हजार मुलींकडून नीट परीक्षेसाठी पूर्वतयारी करून घेण्यात येईल. त्या कोचिंगसाठी लागणारा सर्व खर्च जम्मू-काश्मीर प्रशासन करणार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरEducationशिक्षण