काश्मीर खो-यातील स्थिती सुधारतेय
By Admin | Updated: September 29, 2014 06:07 IST2014-09-29T06:07:56+5:302014-09-29T06:07:56+5:30
काश्मीर खोऱ्यातील महापुराच्या विध्वंसानंतर स्थिती हळूहळू सामान्य होत आहे़ आरोग्य सेवा पूर्ववत होत असून अनेक प्रमुख रुग्णालयांतील गाळ साफ करून सफाईचे काम सुरू आहे़

काश्मीर खो-यातील स्थिती सुधारतेय
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील महापुराच्या विध्वंसानंतर स्थिती हळूहळू सामान्य होत आहे़ आरोग्य सेवा पूर्ववत होत असून अनेक प्रमुख रुग्णालयांतील गाळ साफ करून सफाईचे काम सुरू आहे़
राज्याने पूरग्रस्त घरांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या भरपाईची रक्कम ७५०० कोटी करण्याची मागणी पुढे रेटली आहे़ पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांची अंदाजे संख्या लाखाच्या घरात आहे़ तूर्तास राज्याला या घरांच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटी मिळणार आहेत़ मात्र राज्य सरकारने उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी ५ लाख व आंशिक नुकसान झालेल्या घरांसाठी दोन लाख देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे़