काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जावा लागेल
By Admin | Updated: September 17, 2014 03:07 IST2014-09-17T03:07:33+5:302014-09-17T03:07:33+5:30
काश्मीर खो:यातील नागरिकांचे सामान्य जीवन सुरू होण्यास व काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.

काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जावा लागेल
श्रीनगर : राज्यातल्या पूरग्रस्त भागातील पाणी ओसरणो व वस्त्यांमधील पाणी पंपांच्या साहाय्याने काढणो सुरू असले तरी काश्मीर खो:यातील नागरिकांचे सामान्य जीवन सुरू होण्यास व काश्मीरचे पुन्हा नंदनवन होण्यास काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेला जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे मदतकार्याला अधिक वेग येणार
आहे.
येथे कोसळलेल्या अरिष्टामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधणो सध्या अवघड आहे. जे नागरिक घरे सोडून सुरक्षित स्थळी गेले होते ते परत येऊन आपल्या घराच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत आहेत. ङोलम नदीचे पाणीही ओसरू लागले आहे. जुन्या शहरातील अनेक वस्त्या अद्याप जलमय असून त्यातील नागरिक अन्यत्र सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत व त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत.
आधी पावसाच्या व नंतर पुराच्या तडाख्यात सापडलेले नागरिक या आपत्तीनंतर एकमेकांना भेटताना व एकदुस:याची ख्यालीखुशाली विचारताना दिसत आहे. 6 सप्टेंबर रोजी कोसळलेल्या पावसामुळे काय काय घडले याची प्रत्येकाजवळच एक स्वतंत्र कहाणी आहे.
गोजीबाग भागात राहणारे मोहम्मद शफी सांगतात, आधी वाटले की पाणी थोडेफार वाढेल पण ते 12 फुटांर्पयत जाईल असे मुळीच वाटले नाही. या भागातील पाणी आता ओसरत चालले आहे. ज्या घरांना रिकामे करण्यात आले होते तेथे चोरीच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक परिवहन सेवा मुख्य रस्त्यांवरून सुरू झाली आहे. विमानतळाकडे जाणारा रस्ता अजूनही पाण्यात बुडालेला असून ऐतिहासिक लाल चौक व त्याच्याजवळील भाग अद्याप पाण्याखाली आहे.
गावागावातील दुकाने उघडत असून त्यात वाचलेल्या सामानाचा हिशेब दुकानदार लावीत आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू असून वीज व अन्य सेवाही नियमित झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)
पुरामुळे कोसळलेल्या घरात 13 मृतदेह आढळले, मृतांचा आकडा 2क्क् वर
4श्रीनगर-येथील जवाहरनगर भागात मदत पथकांना 13 मृतदेह आढळले असून यामुळे एकूण मृतांची संख्या 2क्क् च्या वर गेली आहे. गोगजीबाग तटावर दोन मृतदेह आणलेल्या मदत पथकातील अब्दुल हमीद याने, एका घरात 13 मृतदेह आढळून आल्याचे सांगितले. हे घर पुरामुळे कोसळले होते. त्याच्या ढिगा:याखालून दोन मृतदेह बाहेर काढले असून उरलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे असे पुढे नोंदविले.
4घरे कोसळून वा अन्य कारणाने मृत्यू आलेल्या नागरिकांच्या मृतदेहाची ओळख पटविणो हे एक मोठे आव्हानात्मक काम सर्वासमोर उभे आहे. यातील अनेक मृतदेह खराब झाले आहेत तर काहींना कुत्र्यांनी खाल्ल्याने ते ओळखू येण्यापलीकडे गेले आहेत. मात्र हे नागरिक स्थानिक नसावेत असा अंदाज मदत पथकांनी व्यक्त केला आहे. या मृतदेहांमध्ये तीन मुले व दोन प्रौढ व्यक्ती आहेत.
4जवाहरनगर व राजबाग भागातील पाणी 3क् पंप लावण्यात येऊन काढण्याचे काम सुरू झाले आहे. या भागातील रस्ते मोकळे व स्वच्छ होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल असे मत आमिर नाजीर या स्थानिक नागरिकाने व्यक्त केले.